उत्पल पर्रीकर आज अर्ज भरणार

0
8

पणजी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर हे गुरुवार दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उत्पल पर्रीकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सुद्धा गुरुवारी साखळी मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.