दि. २० रोजी सुरू होणार्या ४४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे. ११ दिवस चालणार्या या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार असल्याने आयोजकांची जोरात तयारी सुरू आहे.
एकूण ७४ देशांतील ३२५ चित्रपट दाखवण्यात येणार असून त्यात १६० विदेशी चित्रपट प्रदर्शित केले जातील असे भारतीय इन्फॉर्मेशन ब्युरोचे अतिरिक्त सरसंचालक के. एम. रवींद्रम यांनी पत्रकारांना सांगितले. फिचर फिल्म स्पर्धेसाठी सुमारे १३ कोटींची बक्षिसे देण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.