आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकवर विजय

0
45

आशिया चषक स्पर्धेतील बहुचर्चित अशा भारत-पाक सामन्यात काल भारताने पाकिस्तानला नमवत दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने पाच गडी राखून गाठले. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजी करताना त्याने तीन गडी बाद करून पाकिस्तान संघाला रोखले. तर भारताची बिकट स्थिती असताना त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावत ३३ धावा केल्या.