आम आदमी पक्षाचे सर्व उमेदवार जाहीर

0
5

आम आदमी पक्षाने मंगळवारी सातवी यादी जाहीर करत आणखी ३ उमेदवार जाहीर केले. आपने आतापर्यंत आपले सर्व उमेदवार जाहीर केले असून, ३९ जणांना उमेदवारी दिली आहे, तर डिचोलीत डॉ. चंद्रकांत शेटये यांना पाठिंबा दशर्ववला आहे.

आपने काल जाहीर केलेल्या सातव्या यादीत मुरगाव मतदारसंघातून परशुराम सोनुर्लेकर, साळगाव मतदारसंघातून मारिओ कार्देरो आणि हळदोणा मतदारसंघातून महेश साटेलकर यांना उमेदवारी दिली आहे.