कायतान डिसिल्वा याच्याकडे भारतीय तसेच पोर्तुगीज असे दुहेरी नागरिकत्व आहे. ते विदेशी नागरिक असल्याने तो विधानसभा निवडणूक लढवू शकत नाही. त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी तिने याचिकेत केली आहे. ही याचिका वालंका आलेमावतर्फे वकील एस कर्पे यांनी काल दाखल केली. दुहेरी नागरिकत्व असलेल्यांना गोव्यात निवडणूक लढवता येत नाही. सर्व कागदोपत्री पुरावे आहेत, असे वालंका आलेमाव यांनी सांगितले. याप्रकरणी लवकरच सुनावणी होणार असल्याचे समजते.
पहिल्यांदाच आमदार बनलेले कायतान डिसिल्वा यांनी मिकी पाशेकोंच्या गोवा विकास पार्टीच्या तिकीटावर बाणावली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती व प्रतिस्पर्धी कॉंग्रेच उमेदवार वालंका आलेमांव यांच्याविरुद्ध २००१ मताधिक्याने निवडून आले होते. वालंकाला ७६९४ मते तर कायतानना ९६९५ मते मिळाली होती.
दरम्यान, कायतान डिसिल्वा यांनी वालंका यांच्या आरोपांचे खंडन करताना आपण भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याकडे विदेशी पासपोर्ट नसल्याचेही त्यांनी नमूद केले. आलेमांव घराणे पराभव पचवू शकत नसल्याने अशाप्रकारचे आरोप करीत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, माजोर्डा पंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मी गोन्साल्विश हिच्यावर विदेशी नागरिकत्व प्रकरणी याचिका दाखल करून तिला अपात्र ठरविण्यात आले होते.