ओरिसातील बिजू जनता दलाचे आमदार झिना हिक्का यांची काल माओवाद्यांनी ३३ दिवसांनंतर मुक्तता केली. माओवाद्यांच्या ‘प्रजा न्यायालयात’ हिक्का यांच्या मुक्ततेचा निर्णय झाल्यानंतर त्यंाना आदिवासींच्यासोबत पत्नी कौशल्या माझी यांच्या स्वाधीन करण्यात आले.
मला चांगली वागणूक मिळाली, अशी माहिती आमदार हिक्का यांनी दिली. दरम्यान, आमदारांनी प्रजा कोर्टात आमदारकी तसेच बीजेडी पक्षाचे सदस्यत्व सोडून लोकांसाठी वावरणार असल्याचे सांगिल्याचे कळते.