आधी इंधन दर भरमसाट वाढवले आता किंचित घटवले : आमोणकर

0
7

>> केंद्र सरकारकडून देशातील जनतेची थट्टा

पेट्रोल व डिझेल प्रती लिटर ३० ते ३५ रुपयांनी वाढवल्यानंतर आता अवघ्या काही रुपयांनी हे दर खाली आणून केंद्र सरकारने देशातील जनतेची थट्टा केली असल्याची टीका काल मुरगाव मतदारसंघाचे आमदार संकल्प आमोणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

गॅस सिलिंडरचे जे दर ३६० रुपये एवढे होते ते केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आता जवळजवळ १ हजार रुपयांच्या वर गेलेले आहेत, याकडेही आमोणकर यांनी लक्ष वेधले.
राज्यात पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यानंतर कडधान्ये, भाजी, खाद्यतेल व अन्य सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. आता डिझेल लिटरमागे ७ रुपयांनी स्वस्त झाले म्हणून या जीवनावश्यक वस्तूंचे दर काही खाली येणार नाहीत, असेही आमोणकर म्हणाले.