आणखी १५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

0
16

गोवा विधानसभेच्या येत्या १४ फेब्रुवारीला होणार्‍या निवडणुकीसाठी काल १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

भाजपने उमेदवारी नाकारलेल्या माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी काणकोण मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळीतून, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी मडकईतून, भाजपचे आमदार नीळकंठ हर्ळणकर यांनी थिवीतून, भाजपचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी शिरोड्यातून, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी प्रियोळमधून, माजी आमदार रोहन खंवटे यांनी पर्वरीतून, माजी आमदार नरेश सावळ यांनी डिचोलीतून आणि कॉँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी मुरगावातून अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या इतर उमेदवारांमध्ये नीलिमा खंवटे (पर्वरी), पूजा मयेकर (हळदोणा), केतन प्रभू (फोंडा), श्रद्धा आमोणकर (मुरगाव), विशाल नाईक (कुठ्ठाळी), अजय बोयर (कुडचडे) यांचा समावेश आहे.