येथील दत्त मंदिरानजीक वाळवंटी नदीकिनारी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव आज होत आहे.
सकाळी पिंपळपेड येथे पूजा, संध्याकाळी ५ वा. मिरवणूक, ७ वा. विठ्ठल मंदिर परिसरात नौकांचे परीक्षण, संध्याकाळी ७.३० वा. श्रीकृष्णाचे वाळवंटी नदीच्या पात्रात प्रस्थान असा कार्यक्रम असेल. रात्री ११.३० पर्यंत चालणारा नदीच्या पात्रातील नौकांचा विहार या उत्सवाचे खास आकर्षण असते.
दरम्यान, पर्यटन खात्याने त्रिपुरारी पौर्णिमा कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छीणार्यांसाठी खास ‘पॅकेज टूर’ आयोजित केला आहे. यात सहभागी होणार्या स्थानिक/पर्यटकांना नौकाविहाराबरोबरच मये तलावात नि:शुल्क बोटीतून भ्रमणाचा तसेच बुफे जेवणाचा आनंद लुटता येईल. यासाठी प्रत्येकी रु. ३२५ व जोडप्यांचे रु. ६०० आकारले जातील. संपर्क : पणजी रेसिडन्सी २२२३३९६.