Home बातम्या आज मतदान

आज मतदान

0

कडक सुरक्षा व्यवस्था

निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच परवा रात्रीपासूनच प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात तसेच रस्त्यावर शस्त्रधारी पोलीस तैनात होते. वाहनांचीही कसून तपासणी केली जात होती.

सर्व महामार्गांवर तसेच मतदारसंघाच्या प्रवेशमार्गांवर कडक बंदोबस्त आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी घरी बसून राहणेच पसंत केल्याचे दिसत होते. दरम्यान, आज मध्यरात्रीपर्यंत कोरडा दिवसचालणार असल्याने मद्यावरही निर्बंध आहेत.

एकूण १० लाख मतदार

एकूण १० लाख २६ हजार ३०६ मतदार आजच्या मतदानासाठी पात्र आहेत.

त्यात उत्तर गोव्यात ५ लाख ७८ हजार ९८४ तर दक्षिण गोव्यात ४ लाख ४७ हजार ३२२ मतदार आहेत. उत्तर गोव्यात पुरुष मतदारांची संख्या २ लाख ८८ हजार ६३१ तर महिला मतदारांची संख्या २ लाख ९० हजार ३५३ आहे. दक्षिण गोव्यात २ लाख २२ हजार ४८० पुरुष तर २ लाख २४ हजार ८४२ महिला मतदार आहेत.

१६ अनिवासी भारतीय मतदार तर लष्करी सेवेतील ५६२ मतदार आहेत.

पहिल्यांदाच होणार पोल मॉनिटरिंग

या निवडणुकीत पीएमएस म्हणजे पोल मॉनिटरिंग सिस्टमचा पहिल्यांदाच वापर केला जाणार आहे. या अंतर्गत मतदानाला येणार्‍या मतदारांचे हाताचे ठसे व छायाचित्रे संगणक प्रणालीद्वारे टिपण्यात येतील.

दरम्यान, या नव्या व्यवस्थेमुळे मतांच्या गोपनीयतेला काहीच बाधा येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. हे ठसे व छायाचित्रे बोगस मतदान होणार नाही, याची खबरदारी म्हणून घेण्यात येतील. ही माहिती सांभाळून ठेवली जाणार असून त्याचा वापर पुढील निवडणुकांवेळीही करण्यात येईल. छायाचित्रे व ठसे घेणार्‍या यंत्राचा मतदान यंत्राला किंवा ईव्हीएमनियंत्रक यंत्राशी काहीच संबंध नसेल असेही स्पष्ट केले आहे.