Home बातम्या आज जांबावलीचा गुलालोत्सव

आज जांबावलीचा गुलालोत्सव

0

मठग्रामस्थ हिंदु सभेतर्फे दरवर्षी साजरा करण्यात येणारा जांबावली येथील श्री दामोदर देवस्थानातील शिमग्यातील गुलालोत्सव मंगळवारी २० मार्च रोजी साजरा होणार आहे. दुपारी तीन वाजता श्री रामनाथ देवासमोरील प्रांगणात पालखीत विराजमान असलेल्या श्री दामोदर देवाला गुलाल अर्पण करून गुलाल उधळण्यात येणार आहे.

त्यानंतर ढोल ताशे, सुवारीवादन व श्री दामोदराच्या जयघोषात सर्वत्र गुलाल उधळला जातो व क्षणार्धात सर्व आसमंत लाल गुलालाने भरून जातो. गुलाल उधळल्यानंतर काहीजण कुशावती नदीत देवाच्या पाणट्यावर स्नान करतात व देव दर्शन घेऊन परततात. गुलालानंतर सायंकाळी पाच वाजता पालखी श्री दामोदराच्या देवळात जाते. रात्री नवरदेवाची वरात व संगीत सभेचा कार्यक्रम होईल.