अशोक सराफ यांची ‘पद्मश्री’साठी शिफारस करणार ः मुनगंटीवार

0
20

यंदाचा अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात येईल, राज्य सरकार तशी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ यांना द्यावी ही विनंती करणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अशोक सराफ यांचे कौतुक करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मराठीसह हिंदी रसिकांच्या मनावर अशोक सराफ यांनी राज्य केले. त्यांनी आपल्या अभिनयातून समाजातील संस्कारही प्रकट केला, तर दुसरीकडे प्रशासनातील दोषही तेवढ्याच ताकदीने मांडले. त्यांची शब्दफेकही ताकदीची आहे. अशोक सराफ यांनी गेली अनेक दशके प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जनतेच्या मनावर राज्य केल्याचे मुनगंटीवार म्हणाले.