पाकिस्तानच्या पंजाबमध्ये बसला आग, 18 मृत्यू

0
11

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी सकाळी एका बसला आग लागली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. लाहोरपासून सुमारे 140 किमी अंतरावर फैसलाबाद मोटरवेच्या पिंडी भटियान शहरात पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. येथे बस पिकअप व्हॅनला धडकली. कराचीहून इस्लामाबादला जात असलेल्या बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते.या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांचा जळून मृत्यू झाला आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजलेल्या आणखी 16 जणांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. बसमधून उडी मारण्यात यशस्वी झालेल्या प्रवाशांचा जीव वाचला.