अमित पाटकर यांची न्यायालयात धाव

0
10

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. पाटकर यांनी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांच्या विरोधात सभापतींसमोर अपात्रता याचिका 9 डिसेंबर 2022 रोजी दाखल केली होती; मात्र सभापतींनी या याचिकेवर अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे तीन महिन्याच्या आत याचिकेवर निर्णय घेणे बंधनकारक आहे, असा दावा पाटकर यांनी केला आहे.