Home बातम्या अपक्ष उमेदवार गजांआड

अपक्ष उमेदवार गजांआड

0

साळगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार फ्रान्सिस्को झेवियर कुलासो यांना काल पर्वरी पोलिसांनी अटक केली.

एफ ऍण्ड सी कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक व बिल्डर यांना दिलेला धनादेश न वटल्याच्या गुन्ह्यावरून १३८ (एनआयए) कलमाखाली पर्वरी पोलिसांनी त्यांना अटक केली. कुलासो रेईस मागूस पंचायतीचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर धनादेश न वटण्याच्या प्रकरणात गुन्हे नोंद झाले असून त्याच एका प्रकरणात म्हापसा येथील न्याय दंडाधिकार्‍यांनी अटक करण्याचे आदेश दिले असता पर्वरी पोलिसांनी त्यांना निवासस्थानाहून अटक केली.

पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर, उपनिरीक्षक सुरज गावस, शिपाई शाम महाले, विनय श्रीवास्तव आणि मेघनाथ गडेकर यांनी सापळा रचून ही कारवाई केली. आज दि. २८ रोजी कुलासो याना म्हापसा येथील न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात येणार आहे.