>> ४० दुरूस्ती विधेयकांना मान्यता
गोवा विधानसभेच्या दहा दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता काल झाली. सभापती रमेश तवडकर यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले.
या अधिवेशनात एकूण ४० दुरुस्ती विधेयकांना मान्यता देण्यात आली आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २६ दुरुस्ती विधेयके संमत करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन गोवा विनियोग विधेयकांना मान्यता देण्यात आली आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन करणारा ठराव संमत करण्यात आला. तसेच, राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठराव संमत करण्यात आला आहे. वर्ष २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली.