Home बातम्या अखेर विश्‍वास देसाई काणकोण पोलिसांना शरण

अखेर विश्‍वास देसाई काणकोण पोलिसांना शरण

0
या दुर्घटनेत एकूण ३३ मजुरांचा बळी गेला. या दुर्घटनेला जबाबदार धरून बांधकामाच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखविल्याची कारणे समोर करुन श्री. देसाई यांच्या शोधात काणकोणचे पोलिस होते. मात्र अटक चुकविण्यासाठी श्री. देसाई यांनी केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर १४ रोजी सकाळी १२च्या दरम्यान श्री. देसाई यांनी केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर १४ रोजी सकाळी १२च्या दरम्यान श्री. देसाई पोलिस स्थानकावर हजर झाले. देसाई यांच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिस निरीक्षक हरिष मडकईकर यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, रूबी रेसिडेन्सी इमारत दुर्घटनेत बळी गेलेल्या मजुरांचा अधिकृत आकडा ३१ असल्याचा दावा करून बचाव कार्यासाठी उभारलेली मोहीम थांबविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी वेनोंसिओ फुर्तादो यांनी दिली. मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेलेले मृतदेह संबंधितांच्या राज्यात पाठविण्यात आले आहेत. काणकोणच्या सहाही मजुरांच्या मृतदेहांवर अंतिम संस्कार करतानाच सरकारने जाहीर केलेले आर्थिक सहाय्य प्रत्येक आपदग्रस्त कुटुंबापर्यंत पाठविण्यात आले असल्याची माहिती श्री. फुर्तादो यांनी दिली.
या दुर्घटनेला जबाबदार धरून काणकोणचे मुख्याधिकारी प्रशांत शिरोडकर यांना भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याखाली अटक करण्यात आले आहे. तर पालिका अभियंता अजय देसाई, नगरनियोजक प्रकाश बांदेकर या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. श्री. बांदोडकर यांच्या पुढील तपासासाठी अजून सात दिवसांचा रिमांड मागून घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.