Home बातम्या अकरा पोलीसनिरीक्षकांची बदली

अकरा पोलीसनिरीक्षकांची बदली

0

पोलीस मुख्यालयातून 11 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश काल जारी करण्यात आला. कळंगुटचे पोलीस निरीक्षक म्हणून लक्षी आमोणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कळंगुटचे निरीक्षक परेश नाईक यांची रायबंदर येथील गुन्हा विभागात बदली करण्यात आली आहे. अरुण गावस देसाई यांची मडगाव शहर पोलीस स्थानक, रामनाथ ऊर्फ कपील नायक यांची मायणा कुडतरी पोलीस स्थानक, सूरज सामंत याची टीईसी पणजी, विजयनाथ कवळेकर यांची पणजी सुरक्षा विभाग, मोहन गावडे यांची फोंडा पोलीस स्थानक, मिलिंद भुईंबर यांची पोलीस मुख्यालय, दिनेश गडेकर यांची साळगाव पोलीस स्थानक, नाथन आल्मेदा यांची पणजी सुरक्षा विभाग, महिला पोलीस निरीक्षक सुवर्णा तळगावकर यांची जीआरपीमध्ये बदली करण्यात आली आहे.