Home बातम्या शिरगाव जत्रेची तयारी;भाजपकडून आढावा

शिरगाव जत्रेची तयारी;भाजपकडून आढावा

0

शिरगाव येथील जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष दामू नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, सिद्धार्थ कुंकळकर व दयानंद कारबोटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिरगाव येथे भेट देऊन जत्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान देवस्थान समिती व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून जत्रोत्सवाची तयारी, सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नियोजन याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जत्रोत्सव सुरळीत व यशस्वीपणे पार पडावा यासाठी भाजप कार्यकर्ते सर्वतोपरी सहकार्य करतील, असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले. पाच दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवासाठी स्वच्छ व सुयोग्य व्यवस्था राखण्यासाठी प्रशासन व देवस्थान समितीला स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळेल, असेही त्यांनी सांगितले.