मध्य पूर्व आशियात गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरू असून काल ओमानच्या एका बंदरावर भीषण हल्ला झाला आहे. ओमानच्या सलालाह बंदरावर बुधवारी हल्ला झाला. त्यामुळे तेल साठे करणाऱ्या टाक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर तेल टँकरमधून काळ्या धुराचे लोट आसमंतात पसरले. तेल साठ्याला भीषण आग लागली आहे. हल्ल्यानंतर सलालाह बंदर रिकामी करण्यात आले आहे. ओमानच्या आग्नेय दिशेला सलालाह बंदर आहे.