जमशेदपूरची उदिशावर मात

0
139

हीरो इंडियन सुपर लीगमध्ये नवे नाव धारण केलेल्या उदिशा एफसीला सलामीच्या सामन्यात जमशेदपूर एफसीने २-१ असे हरविले. रेड कार्डमुळे एक खेळाडू कमी होऊनही जमशेदपूरने विजय नोंदविला. पाच मिनिटे बाकी असताना स्पेनच्या सर्जिओ कॅस्टेल याने केलेला गोल निर्णायक ठरला.

पूर्वार्धात एका गोलची बरोबरी होती. १७व्या मिनिटाला यजमान संघाने खाते उघडले होते. फारुख चौधरीने हा गोल केला. मध्यंतरास पाच मिनिटे बाकी असताना उदिशाने स्पेनच्याच अरीडेन सँटानाने उदिशाला बरोबरी साधून दिली होती.
जमशेदपूर एफसीचा गेल्या मोसमात प्ले-ऑफमधील प्रवेश थोडक्यात हुकला होता. त्यानंतर त्यांनी मोहीमेला विजयी सुरुवात करून घरच्या मैदानावर निर्णायक विजयाचे तीन गुण वसूल केले.

खाते उघडण्याची शर्यत जमशेदपूरने जिंकली. न्यो ऍकोस्टा याने पूर्वार्धाच्या प्रारंभी उजवीकडून आगेकूच केली. त्याने मैदानालगत मारलेला क्रॉस शॉट रोखण्याचा प्रयत्न उदिशाचा बचावपटू राणा घरामी याने केला, पण त्याला सफाई दाखवता आली नाही. चेंडू त्याच्या पायाला लागून गोलरक्षकाला चकवून नेटमध्ये गेला.

आघाडी घेऊनही जमशेदपूरला धसमुसळा खेळ भोवला. ३४व्या मिनिटाला पिटीने फ्री किकवर मारलेला चेंडू खेळाडूंच्या वॉलला लागला. जेरी माहमिंगथांगाने प्रतिआक्रमण रचण्याचा प्रयत्न केला, पण जमशेदपूरच्या बिकाश जैरूने मैदानावर घसरत बॉक्सजवळ त्याला पाडले. त्यामुळे जैरूला रेड कार्ड दाखविण्यात आले. एक खेळाडू कमी झाल्याचा जमशेदपूरला लवकरच फटका बसला. ४०व्या मिनिटाला जेरी माहमिंगथांगाने जोरदार चाल रचत उजवीकडून सँटानाला पास दिला. सँटानाने मग सफाईदार फिनीशिंग केले.