गिरी येथे काल सकाळी तिठ्याजवळ रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वेगाने जाणार्या वाहनाने सरिता वामन बुरन (२२) या युवतीला ठोकर दिल्याने ती गंभीर जखमी झाली. नंतर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू असताना संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. गिरी येथील जंक्शनवर सकाळी ८ वाजणाच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सरिता बुरन ही रस्ता ओलांडित असतानाच भरधाव वेगाने येणार्या एका हुंडाई वाहनाने तिला ठोकरले. म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विश्वजीत चोडणकर यांनी पंचनामा केला व या अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.