साकोर्डा येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून बलात्कार केला व तिच्यावर मातृत्व लादल्याप्रकरणी कुळे पोलिसांनी काल दुसरा संशयित आरोपी गिरू उर्फ उपेंद्र कालेकर (३०) बोळकर्णे – साकोर्डा याला अटक केली. रुपेश बाबलो गावकर (२७) होंडा सत्तरी या संशयिताला परवा अटक करून अधिक चौकशीसाठी सात दिवसांचा रिमांड घेतला आहे. मुलीच्या आईने तक्रार नोंदवल्यानंतर कारवाई करण्यात आली. निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज गावस अधिक तपास करीत आहेत.