Home बातम्या वास्को येथे दोन गटांत मारामारीत चार जखमी

वास्को येथे दोन गटांत मारामारीत चार जखमी

0

नवेवाडे येथे दोन गटामध्ये झालेल्या मारामारी एकूण चारजण जखमी झाले असून वास्को पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवेवाडे येथे दांडिया नृत्य स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी शनिवार रात्री वाडे व खारीवाडा येथील दोन गटामध्ये किरकोळ स्वरूपाची बाचाबाची व नंतर मारहाण झाली होती. या प्रकरणाची तक्रार वाडे येथील ग्रासियस कुतिन्हो व इतर १० जणांनी वास्को पोलीस स्थानकामध्ये केली.

पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करून नंतर दोन्ही गटातील युवकांना समज देऊन तेथून जाण्यास सांगितले.ग्रासियस कुतिन्हो हे आपल्या समर्थकांसह वाडे येथे जाऊन बसले होते. काही वेळाने खारीवाडा येथील दुसर्‍या गटाच्या रुपेश नाईक, सतीश नाईक, स्वप्नील नाईक मंगेश नाईक, महम्मद शेख, ऍन्ड्र्यु मानुएल डिसोझा व इतरांनी ग्रासियस गटावर दंडुके व इतर हत्यारांसह एकदम हल्ला करून मारहाण केली. यावेळी ग्रासियस गटातील एकाला जवळच्या तालावामध्ये फेकून देण्यात आले. सदर हल्ल्यामध्ये कलंदर खान व इतर तिघे गंभीर जखमी झाल्याने त्याना बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले. कलंदर याच्या डोक्याला मार बसल्याने त्याच्यावर गोमेकॉत उपचार चालू आहेत. वास्को पोलिसांनी रात्रीच कारवाई करताना रूपेश नाईक व सतीश नाईक (रा. खारीवाडा) याला लगेच अटक करून त्याना १० दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे तर मंगेश नाईक, महम्मद शेख, स्वप्नील नाईक व ऍन्ड्र्यु मानुएल डिसोझा याना रविवारी संध्याकाळी अटक केली आहे. वास्को पोलिसांनी याप्रकरणी भा. दं. सं. १४३, १४७, १४८, ३२६, ४२७ आर./बी. १४९ आयपीसी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रूपेंद्र शेटगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाईक पुढील तपास करीत आहेत.