सर्वोच्च न्यायालयातील आमदार अपात्रता प्रकरणातील याचिकेवर मंगळवारी सुनावणी होऊ शकली नाही. या अपात्रता याचिकेवर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.
गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केलेली आहे. या अपात्रता याचिकेतील प्रमुख प्रतिवादी गोवा विधानसभेच्या सभापतींच्या वकिलांनी या याचिकेसंदर्भात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रता प्रकरणी याचिका तातडीने निकालात काढण्याचा आदेश दिलेला आहे. तथापि, गोवा विधानसभेच्या सभापतींनी अपात्रता याचिका प्रकरणातील याचिकेवर निर्णय न घेतल्याने गोवा प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.