जम्मू- काश्मीरमध्ये आणखी एका भाजप नेत्यावर गोळीबार

0
150

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हमीद नजार यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात ते जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, भाजपच्या ४ नेत्यांनी काल आपला राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. भाजाप नेते व कार्यकर्त्यांवर दहशवाद्यांकडून हल्ला होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झाल्याचे दिसत आहे.

या अगोदर ६ ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंड ब्लॉकच्या वेस्सु गावात भाजपचे सरपंच सजाद अहमद यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या चार नेत्यांनी बडगाममध्ये राजीनामा दिला आहे. या अगोदर कुलगामच्या देवसर येथील भाजपचे सरपंच, भाजप नेते सबजार अहमद पाडर, निसार अहमद वानी आणि आशिक हुसैन पाला यांनी राजीनामा दिलेला आहे.