पाकमधून राजस्थानात आलेल्या ११ जणांचे मृतदेह सापडले

0
166

राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एका शेतात पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू परिवारातील ११ सदस्यांचे मृतदेह सापडले. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या परिवारातील एक सदस्य जिवंत सापडला आहे.पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याला या प्रकाराबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र सर्वांनी केमिकल सदृष्य पदार्थ पिऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. मृत्यू पावलेले सर्व निर्वासित हे पाकिस्तानमधील भिल्ल समाजाचे लोक असून जोधपूरजवळ एका शेतात सर्व काम पाहण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.