विजयवाडा- आंध्र प्रदेश येथे असलेल्या एका हॉटेलला आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला. या हॉटेलचे कोविड निगा केंद्रामध्ये रुपांतर करण्यात आले असून मृत्यू पावलेले सर्वजण रुग्ण आहेत. यावेळी ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशामक दलाने युद्धपातळीवर काम करीत ही आग विझवली. काल रविवारी पहाटे ५ च्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
आग लागली त्यावेळी या केंद्रामध्ये ३० रुग्ण आणि १० वैद्यकीय कर्चचारी होते. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण हॉटेलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून त्यामुळे इथल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दरम्यान, १७ रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
तर इथल्या सुरक्षा रक्षकासह दोन कर्मचार्यांनी जीव वाचवण्यासाठी दुसर्या आणि तिसर्या मजल्यावरुन उड्या टाकल्या आहेत. एनडीआरएफच्या कर्मचार्यांनी पीपीई किट घालून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले. सध्या आग लागलेले हॉटेल पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. २२ रुग्ण या ठिकाणी उपचार घेत होते.