राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका १८ ऑक्टोबर रोजी घेण्याच्या गोवा राज्य निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला गोवा सरकारने मान्यता दिली आहे. राज्यातील ११ नगरपालिका मंडळांचा कार्यकाल येत्या १० नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्याच्या किमान १५ दिवसांपूर्वी या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
नगरपालिका मंडळांचा कार्यकाल संपण्याच्या १५ दिवस अगोदर निवडणुका घेणे बंधनकारक असल्याचे श्रीवास्तव यांनी काल काही पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.