व्हिन्सी प्रीमियर लीग २२ पासून

0
152

कॅरेबियन बेटांवरील सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडाईन्स या इवल्याशा देशात २२ ते ३१ मे या कालावधीत व्हिन्सी प्रीमियर लीग टी-टेन फ्रेंचायझी लीग स्पर्धा खेळविली जाणार आहे.

७२ खेळाडूंसह एकूण ६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत दररोज ३ आणि एकूण ३० सामने खेळले जातील. हे सर्व सामने सेंट व्हिन्सेंटमधील आर्नोस वेल स्पोर्टिंग संकुलामध्ये होतील. या स्पर्धेमध्ये नवीन नियमही लागू करण्यात येतील. ही पहिली क्रिकेट स्पर्धा असेल ज्यामध्ये लाळ किंवा घाम चेंडू चमकविण्यासाठी वापरला जाणार नाही.

दरम्यान, या स्पर्धेत प्रेक्षकांच्या येण्यावर बंदी नसली तरी त्यांची एका ठराविक अंतरावर बसण्याची व्यवस्था केली जाईल.
सामन्यादरम्यान वैद्यकीय पथकासह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असतील.

सर्व संघासाठी गर्दी टाळण्याच्या हेतूने वेगळे ड्रेसिंग रूमही तयार करण्यात आले आहेत. व्हीपीएलच्या सर्व फ्रेंचायझींनी ११ मे रोजीच ड्राफ्टच्या माध्यमातून खेळाडूंची खरेदी केली.
या लीगमध्ये वेस्ट इंडीजचा सलामीवीर फलंदाज सुनील अंबरिस गोलंदाज केसरिक विलियम्स आणि ओबेड मेकॉय आदी विंडीजचे आंतरराष्ट्रीय खेळाडूही खेळणार आहेत.