केंद्रीय वन आणि पर्यावरण मंंत्री जयंती नटराजन यांचे आज गोव्यात आगमन होत असून न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगाने गोव्यातील बेकायदेशीर खनिज प्रकरणी सादर केल्यानंतर गोव्यात निर्माण झालेल्या खळबळजनक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नटराजन यांच्या आजच्या गोवा भेटीस बरेच महत्च आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खनिज परिसरातील ‘डंप’ हटविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भूमिका आज स्पष्ट होऊ शकेल. गोवा फाऊंडेशन व अन्य पर्यावरण प्रेमी संघटनांची राज्यातील बेकायदेशीय खाणींच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे.