गोमेकॉत कोरोना संशयित ५ रूग्ण

0
136

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २९ जानेवारीपासून आत्तापर्यत कोरोना संशयित २८ जणांची नोंदणी झाली आहे. आत्तापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.
मंगळवार १७ मार्च कोरोना संशयितांचे ४ नमुने आणि १८ मार्चला ६ नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बुधवारी इस्पितळामधून एका रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४३१ प्रवाशांचे स्क्रिनिंग बुधवारी करण्यात आले आहे. आरोग्य खात्याकडे १३३ प्रवाशांनी घरीच निरीक्षणासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

कोरोना संशयित रूग्णांना अलग ठेवण्यासाठी मडगाव येथील ईएसआय इस्पितळामध्ये सोय करण्यात आली आहे. दाबोळी विमानतळावरून कोरोना संशयित रूग्णांना मडगाव येथील ईएसआय इस्पितळामध्ये नेण्यासाठी कदंब महामंडळाच्या चार बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.