‘कोरोना व्हायरस’ ः काळजी कशी घ्याल?

0
455
  •  डॉ. भिकाजी घाणेकर
    (माजी संचालक, आरोग्य खाते)

‘कोरोना’ व्हायरसची लागण फार तीव्र प्रमाणात झाली असता- खोकताना, शिंकताना, लाळ, अश्रू यांचा संसर्ग दुसर्‍या माणसाना होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. ताप आला व खोकला म्हणजे ताबडतोब ‘फ्लू’सारखीच लक्षणे दिसतात. त्यांचा संपूर्ण तपास केला पाहिजे.

‘‘व्हायरस’’ म्हणजे विषाणू- जो साध्या सूक्ष्मदर्शक यंत्र किंवा मायक्रोस्कोपवरून दिसत नाही तर तो पाहण्यास अतिसूक्ष्मदर्शक यंत्र किंवा ‘इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप’ची गरज भासते. अशा तर्‍हेचा मायक्रोस्कोप हा पुणे येथे इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेत उपलब्ध आहे.

यापूर्वी व्हायरसपासून होणारे रोग पुष्कळ आहेत. पण त्यावर चांगले औषध नाही. पण ‘‘लस’’ वा ‘‘व्हॅक्सीन’’ उपलब्ध आहे. लस टोचून संसारभरातला रोग नाहीसा झाला, तो म्हणजे देवी किंवा ‘स्मॉल पॉक्स’, १९७५ मध्ये हे शक्य झाले व याला जागतिक वैज्ञानिक आश्‍चर्य म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने संबोधले.
इतर व्हायरल रोग ज्यांवर लस उपलब्ध आहे – गालगुंड, जपानी मेंदूज्वर, हेपॅटायटीस ए, बी, सी; पोलिओ, गोवर, सरपीण इत्यादी.
कोरोना व्हायरसची लक्षणे…
शिंका येणे, नाकातून पाणी येणे, ताप, खोकला, नाकातून स्राव- रक्तपण जाऊ शकतं. लक्षणे दिसताच रक्त तपासण्या पुणे येथे केल्या जातात. जास्त करून २ ते ५ वर्षे वयाच्या लहान मुलांना, वयस्कर व्यक्ती, गरोदर स्त्री, इतर रोग झालेले रुग्ण इत्यादीं घटकांच्या बाबतीत, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते – त्वरित उपचार सुरू करायला हवेत. लहान मुलांना ड्रीप द्वारे औषधोपचार करावे लागतात कारण या मुलांची प्रतिकारशक्ती फार कमी असते. म्हणून जास्त काळजी घ्यावी लागते. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

चीनमध्ये जिथे जेवतात तिथेच झुरळे, सर्प, उंदीर, पाली इत्यादी फिरत असतात. ते काढून चिनी लोक खातात. ह्यामुळे हा रोग झाला आहे, असे मानतात.

लस शोधून काढण्याचे काम चालू आहे. तपासण्याच्या उपकरणांचे संचही फार मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. सर्व विश्वभर ही काळजी घेण्यात येत आहे.

एका माणसाला कोरोनाची लागण झाली की त्याला २० दिवस पूर्ण होईपर्यंत त्याला बाहेर पाठवत नाहीत. ह्या काळात तो रोग दुसर्‍यांना होण्याची शक्यता असते. यालाच ‘क्वारेंतेन’ म्हणतात.
‘कोरोना’ व्हायरसची लागण फार तीव्र प्रमाणात झाली असता- खोकताना, शिंकताना, लाळ, अश्रू यांचा संसर्ग दुसर्‍या माणसाना होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. ताप आला व खोकला म्हणजे ताबडतोब ‘फ्लू’सारखीच लक्षणे दिसतात. त्यांचा संपूर्ण तपास केला पाहिजे. रक्ताची तपासणी पुणे येथे करतात.
या रोगाचा प्रसार लवकरात लवकर अग्नीसारखा होतो. चीनमध्ये पुष्कळ लोकांना हा रोग झाला. थायलंड, सिंगापूर, कोरिया इत्यादी देशात हा रोग पसरला आहे.

कामाशिवाय चीन व या देशांमध्ये जाणे योग्य नव्हे. जास्त गर्दी करू नये.
– शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा म्हणजे या रोगाचा प्रसार होणार नाही.
– डोळ्यातील अश्रूंपासून हा रोग होऊ शकतो. मास्क बांधणे योग्य ठरेल.
– नाक वा तोंड हे महत्त्वाचे अवयव ज्यापासून रोगाचा प्रसार होतो.
– भारतात व गोव्यात सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहे.
– ताप, खोकला यासारखी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त उशीर करू नये.
– प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा कुठल्याही डॉक्टरांना दाखवावे.
– इलाज पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडू नये.
– ह्या रोगासंबंधी जनजागृती झाली पाहिजे. लोकांना आरोग्य शिक्षण देणे फार महत्त्वाचे.
– आरोग्य खात्याचे कर्मचारी, आंगणवाडी बाया, शाळांचे शिक्षक, मुख्य सेविका, ग्रामसेवक, सरपंच, पंच, निवडून न आलेले सेक्रेटरी, सहसेक्रेटरी इत्यादींना हे आरोग्य शिक्षण द्यावे.
– हायस्कूल, शाळा येथे लहान लहान व्याख्यान द्यावे व अशा प्रकारे आरोग्य शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे.
– दूरदर्शन, आकाशवाणी, टीव्ही चॅनल्स यांनीसुद्धा जागृती करावी म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.
* नाक, तोंड यावर मास्क वापरणे.
* रोग झाल्यास निदान दहा दिवस घरीच रहावे.
* आरोग्य केंद्रावर जाऊन तपासून घ्यावे, विशेषतः रक्ताची तपासणी करून घ्यावी.
* गर्दीत जाण्याचे शक्यतो टाळावे.
ही काळजी घेतली तर या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होणार नाही. मासळी, चिकन, मटण खावून हा रोग होत नाही.