Home बातम्या स्पष्ट बहुमत कोणालाही मिळणार नाही : मुंडे

स्पष्ट बहुमत कोणालाही मिळणार नाही : मुंडे

0

२०१४ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस व भाजप या दोन प्रमुख पक्षांपैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही या लालकृष्ण अडवानी यांच्या विधानाविषयी काल गोपिनाथ मुंडे यांनी सहमती दर्शविली.

वरील निवडणुकीत कॉंग्रेस किंवा भाजप या दोघांपैकी कोणालाही बहुमत मिळणार नसून त्यामुळे तिसर्‍या आघाडीला महत्त्व प्राप्त होणार असल्याचे लालकृष्ण अडवानी यांनी जे विधान केले होते त्याच्याशी आपण पूर्ण सहमत असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपचा खटाटोप चालू असल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. मायावती, मुलायमसिंग यादव आदी नेत्यांच्या यूपीए सरकारला पूर्ण पाठिंबा आहे. केंद्रातले सरकार अल्पमतात येण्याची कोणतीही शक्यता नसून त्यामुळे मध्यावधी निवडणुकांचा प्रश्‍नच नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.