सुरावली-कोलवा येथे खून झालेल्या दोन परप्रांतीय मजुरांची ओळख पटली असून ते दोघेही कर्नाटकमधील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. खून झालेल्यांपैकी एकाचे नाव रमेश व दुसर्याचे राजेश अशी आहेत. तर फरारी झालेला मजूरही कर्नाटकचाच असून त्याचे नाव राजू असल्याचे सांगण्यात आले.
रमेश याचा मृत्यू डोक्यावरील आघातांमुळे व राजेश बुडून मरण पावल्याचे शवचिकित्सेत आढळून आल्याचे सांगण्यात आले. सुरावली येथील सांतान कार्वालो यांच्या शेतावर या मजुरांना गुरुवारी कामानिमित्त आणण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात धागेदोरे मिळालेले नाहीत.