मुरगांव बंदरातील धक्का क्र. ९ मधील मुरगाव ओअर हेडलींग प्लांट (एम. ओ. एच. पी.) मध्ये इलेक्ट्रोनिक अनलोडरला काल अचानक आग लागली. सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान या दुर्घटनेमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार बुधवारी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एम. ओ. एच. पी. प्लांट २१२ डाऊन असल्याने कंत्राटी कामगारांतर्फे सध्या माल हाताळणीचे काम सुरू आहे.
बार्जद्वारे मुरगाव बंदरामध्ये येणारा खनिज माल उतरविण्याचे काम इलेक्ट्रॉनिक अनलोडरद्वारे केले जात आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आगीने पेट घेतला.