Home बातम्या तोयबाशी संबंधांच्या संशयाने ११ जणांना अटक

तोयबाशी संबंधांच्या संशयाने ११ जणांना अटक

0

बेंगलोर पोलिसांनी काल एका महत्त्वाच्या कारवाईत लष्कर ए तोयबा, हुजी या कुप्रसिद्ध दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून ११ जणांना अटक केली. कर्नाटकातील काही खासदार, आमदार, प्रसिद्ध पत्रकार यांना लक्ष्य करण्याचा त्यांचा बेत होता, असा दावा करण्यात आला आहे.

त्यांच्याकडून ७.६५ एमएम विदेश बनावटीचे पिस्तुल, काडतुसे जप्त करण्यात आली. अटक केलेल्यांत एकजण इंग्रजी दैनिकातील पत्रकार आहे. सर्वजण वयाने तिशीच्या आतील आहेत.