म्हापसा बसस्थानकासाठी २.९६ कोटींची निविदा

0
122

>> गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने म्हापसा बसस्थानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ९६ लाख ६१ हजार ०२७ रुपयांची निविदा जारी केली आहे.

राज्य सरकारकडून गेल्या कित्येक वर्षापासून म्हापसा येथे बसस्थानक उभारण्यासाठी घोषणाबाजी केली जात होती. म्हापशाचे दिवंगत आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी नवीन बसस्थानकासाठी प्रयत्न केले होते. तथापि, त्यांच्या कार्यकाळात म्हापसा बसस्थानकाच्या बांधकामासाठी निविदा जारी होऊ शकली नाही. आता, दिवंगत त्यांचे पुत्र आमदार जोशुआ डिसोझा यांच्या कार्यकाळात बसस्थानकाच्या बांधकामासाठी अखेर निविदा जारी करण्यात आली आहे. म्हापसा येथे जुना बसस्थानक अपुरा पडत आहेत. उत्तर गोव्यातील प्रमुख केंद्र असल्याने सुसज्ज बसस्थानकाची नितांत गरज आहे. म्हापसा येथे आकर्षक बसस्थानक बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बसस्थानकासाठी जागा कित्येक वर्षांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेली आहे.

म्हापसा बसस्थानकाचे बांधकाम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येत्या २९ फेब्रुवारी २०२० रोजी संध्याकाळी ३ वाजेपर्यत ठेकेदारांकडून भरलेल्या निविदा स्वीकारण्यात येणार आहेत. २ मार्च २०२० रोजी संध्याकाळी ३.३० वाजता ठेकेदारांकडून प्राप्त निविदा उघडण्यात येणार आहेत.