दृष्टी जीवरक्षकांचे आज लाक्षणिक उपोषण

0
120

राज्यातील गेल्या ४ महिन्यांपासून संपावरील दृष्टी जीवरक्षकांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार १ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर एक दिवसाचे उपोषण आंदोलन आयोजित केले आहे.

राज्य सरकारकडून संपावरील जीवन रक्षकांचे संपाचे प्रकरण मिटविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दृष्टी कंपनी, पर्यटन खाते व संपावरील कर्मचार्‍यांची संयुक्त बैठक आयोजित करून संपावर तोडगा काढावा, अशी मागणी कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केली. संपावरील जीवरक्षकांनी आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, मंत्र्यांना सादर केले आहे. तथापि, जीवरक्षकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्य सरकारकडून दृष्टी कंपनीला जीवरक्षक सेवेसाठी कोट्यवधी रुपये दिले जातात. या कंपनीकडून जीवरक्षकांना वेळेवर पगार दिला जात नाही.