सीएए विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शाहीन बाग येथे ठिय्या आंदोलनावर असलेल्या ठिकाणी एका सशस्त्र व्यक्तीने पिस्तुल दाखवून धमकावल्याचे प्रकरण काल घडले. सदर व्यक्तीने तेथील कार्यकर्त्यांना आपले एका राजकीय पक्षाशी संबंध असल्याचे सांगितले.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत सदर व्यक्ती पिस्तुल दाखवित असल्याचे दिसत आहे. सदर व्यक्ती तेथील व्यासपीठावर चढला व त्याने तेथील लोकांना धमकावण्यास सुरुवात केली. मात्र तेथील निदर्शकांनी त्याला पकडून बाजूला काढण्यात यश मिळवले.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले, की त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याच्याजवळील शस्त्राबाबत त्याला विचारले जाईल. त्याची जबानी नोंदविण्यात आली असे पोलिसांनी सांगितले. शाहीन बाग निदर्शकांमध्ये प्रामुख्याने महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. दररोज हजारोंच्या संख्येने सहभाग वाढत आहे.