मुख्यमंत्री पोलीस सुवर्ण पदकाचे मानकरी जाहीर

0
181

गोवा मुक्तीदिनीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री पोलीस सुवर्ण पदकांच्या मानकर्‍यांची नावे जाहीर केली आहेत.
पर्वरी स्थानकाचे पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर, म्हापसा स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांची मुख्यमंत्री पोलीस सुवर्ण पदकासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर, वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रातील साहाय्यक उपनिरीक्षक रॉक इस्तबेरो, मडगाव वाहतूक विभागातील हेड कॉस्टेबल दामोदर मेस्त्री, पणजी शहर पोलीस स्थानकातील हेडकॉस्टेबल सुशांत सावंत, पणजी स्थानकातील पोलीस शिपाई केशव नाईक यांची पोलीस सुर्वण पदकासाठी निवड करण्यात आली आहे.