सेरेंडिपीटी महोत्सवातील कलाकृती पाहून मनेका गांधी भारावल्या

0
153

>> गोव्याविषयी काढले गौरवोद्गार

रविवारपासून गोव्यात सुरु झालेला सेरिंडिपीटी कला महोत्सव पाहून माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी भारावून गेल्याचे पहावयास मिळाले. काल त्या या महोत्सवासाठी जुन्या सचिवालयात आल्या असता या प्रतिनिधीने त्यांना या महोत्सवाविषयी विचारले असता या महोत्सवाचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडत असल्याचे त्या म्हणाल्या.
हा एक अप्रतिम असा कला महोत्सव असून असा कला महोत्सव गोव्यातच होऊ शकतो व गोवाच असा महोत्सव आयोजित करू शकतो अशा शब्दात गांधी यानी या महोत्सवाविषयी तसेच गोव्याविषयी गौरवोद्गार काढले.

गांधी यांनी काल संध्याकाळी ४.३० च्या दरम्यान जुन्या सचिवालयात सेरिंडिपीटी महोत्सवानिमित्त तेथे मांडण्यात आलेल्या विविध कलाकृतींची पाहणी केली. तेथील छायाचित्रांचे कौतुक व स्तुती करण्यास शब्द अपुरे पडत असल्याचे त्या या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या. अजून या महोत्सवातील बर्‍याच कलाकृती पहायच्या आहेत असे त्या म्हणाल्या. यावेळी गांधी यांच्या सोबत कुणीही नव्हते व त्या अत्यंत बारकाईने एक-एक कलाकृती पहात होत्या.