विंडीजची भारतावर ८ गड्यांनी मात

0
114

>> शाय होप, शिमरॉन हेटमायरची शतके

शिमरॉन हेटमायर आणि सलामीवीर शाय होप (नाबाद) यांच्या धडाकेबाज शतकांच्या जोरावर वेस्ट इंडीजने भारताचा ८ गडी राखून पराभव करीत तीन लढतींच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताचा पुढील सामना आता १८ डिसेंबर रोजी विशाखापट्टणमध्ये खेळविला जाणार आहे.

भारताकडून मिळालेले २८७ धावांचे विजयी लक्ष्य विंडीजने ४७.५ षट्‌कांत केवळ दोन गडी गमावत सहज गाठले. दीपक चहरने सुनील अँब्रिसला (९) पायचितच्या जाळ्यात अडकवित भारताला पहिलेच यश मिळवून दिले होते. परंतु त्यानंतर शाय होप आणि शिमरॉन हेटमायर यांनी संघाचा डाव सावरला व भारतीय गोलंदाजीची पिसे कापून काढताना विस्फोटक फलंदाजी करीत दुसर्‍या विकेटसाठी २१८ धावांची द्विशतकी भागीदारी करीत संघाच्या विजयाचा पाया रचला. मोहम्मद शमीने ही जोडी फोडली. त्याने हेटमायरला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. हेमायरने धडाकेबाज शतकी खेळी करताना १०६ चेंडूत ११ चौकार व ७ षट्‌कारांच्या सहाय्याने १३९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर शाय होपने निकोलस पूरनच्या साथीत आणखी गडी बाद होऊ न देता विंडीजला मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून दिला. होप ७ चौकार व १ षट्‌कारासह १०२ धावांवर नाबाद राहिला. तर पूरनने नाबाद २९ धावा जोडल्या.

तत्पूर्वी विंडीकडून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने ८ गडी गमावत २८७ अशी धावसंख्या उभारली होती. लोकेश राहुल (६), विराट कोहली (४) आणि रोहित शर्मा (३६) हे बाद झाल्यानंतर श्रेयश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी ११४ धावांची महत्त्चपूर्ण भागीदारी करीत भरताने विंडीजसमोर २८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रेयस अय्यरने ८८ चेंडूत ५ चौकार व १ षट्‌कारासह ७० तर ऋषभ पंतने ६९ चेंडूत ७ चौकार व १ षट्‌कारासह ७१ धावांचे अर्धशतकी योगदान दिले. केदार जाधवने ४० धावा जोडल्या. रवींद्र जडेजा २१ धावा करून धावचित झाला. विंडीजकडून शेल्डन कॉटरेल, कीमो पॉल आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी २ तर कीरॉन पोलार्डने १ गडी बाद केला.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. कीरॉन पोलार्ड गो. अल्जारी जोसेफ ३६, लोकेश राहुल झे. शिमरॉन हेटमायर गो. शेल्डन कॉटरेल ६, विराट कोहली त्रिफळाचित गो. शेल्डन कॉटरेल ४, श्रेयस अय्यर झे. कीरॉन पोलार्ड गो. अल्जारी जोसेफ ७०, ऋषभ पंत झे. शिमरॉन हेटमायर गो. कीरॉन पोलार्ड ७१, केदार जाधव झे. कीरॉन पोलार्ड गो. कीमो पॉल ४०, रविंद्र जडेजा धावचित (रॉस्टन चेज) २१, शिवम दुबे झे. जेसन होल्डर गो. कीमो पॉल ९, दीपक चहर नाबाद ६, मोहम्मद शमी नाबाद ०. अवांतर ः २४. एकूण ५० षट्‌कांत ८ बाद २८७ धावा.

गडी बाद होण्याचा क्रम ः १-२१ (लोकेश राहुल, ६.२), २-२५ (विराट कोहली, ७), ३-८० (रोहित शर्मा, १८.१), ४-१९४ (श्रेयस अय्यर, ३६.४), ५-२१० (ऋषभ पंत, ३९.४), ६-२६९ (केदार जाधव, ४७.३), ७-२६९ (रविंद्र जडेजा ४७.४), ८-२८२ (शिवम दुबे ४९.३)
गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल १०/३/४६/२, जेसन होल्डर ८/०/४५/०, हेडन वॉल्श ५/०/३१/०, कीमो पॉल ७/०/४०/२, अल्जारी जोसेफ ९/१/४५/२, रॉस्टन चेज ७/०/४२/०, कीरॉन पोलार्ड ४/०/२८/१.

वेस्ट इंडीज ः शाय होप नाबाद १०२, सुनील अँब्रिस पायचित गो. दीपक चहर ९, शिमरॉन हेटमायर झे. श्रेयश अय्यर गो. मोहम्मद शमी १३९, निकोलस पूरन नाबाद २९. अवांतर ः १२. एकूण ४७.५ षट्‌कांत २ बाद २९१ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-११ (सुनील अँब्रोज, ४.१), २२९-२ (शिमरॉन हेटमायर, ३८.४)
गोलंदाजी ः दीपक चहर १०/१/४८/१, मोहम्मद शमी ९/१/५७/१, कुलदीप यादव १०/०/४५/०, शिवम दुबे ७.५/०/६८/०, केदार जाधव १/०/११/०, रवींद्र जडेजा १०/०/५८/०.