आझाद मैदानावर चारशे जीवरक्षकांचे लाक्षणिक उपोषण

0
145

गेल्या दोन महिन्यांपासून संपावर असलेल्या सुमारे चारशे जीवरक्षकांनी काल येथील आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करून सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. सरकारी यंत्रणेकडून जीवरक्षकांच्या संपाची दाखल घेतली जात नसल्याने येत्या ५ डिसेंबरला सकाळी १० वा. मडगाव येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील समुद्र किनार्‍यांवर जीवरक्षकांची संख्या अपुरी असल्याने पर्यटक बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोवा सरकारने दृष्टी या कंपनीशी जीवरक्षक सेवेसाठी केलेले कंत्राटाची मुदत संपली आहे. या कंत्राटामध्ये मोठा घोटाळा करण्यात आलेला आहे. त्यामुळे न्यायासाठी जीवरक्षकांना गेल्या दोन महिन्यापासून सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागत आहे. संपावरील जीवरक्षकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून आगामी काळात आंदोलन तीव्र केले जाईल.