>> जीएफए-वेदान्ता महिला फुटबॉल लीग
पीव्हीसी पर्रा आणि बिदेश इलेव्हन स्पोर्ट्स क्लबने शानदार विजय नोंदवित गोवा फुटबॉल संघटना आयोजित ३र्या जीएफए-वेदान्ता महिला फुटबॉल लीग स्पर्धेत काल पूर्ण गुणांची कमाई केली.
सिरसई मैदानावर झालेल्या सामन्यात पीव्हीसी पर्रा संघाने चर्चिल ब्रदर्स क्लबवर २-१ अशी मात केली. तर अस्नोडा मैदानावरील लढतीत बिदेश इलेव्हनने आल्बर्ट डेव्हलपर्स संघावर १-० अशी निसटती मात केली.
ट्रेसी पिंटोच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने सामन्याच्या प्रारंभीच २र्याच मिनिटला १-० अशी आघाडी मिळविली होती. पीव्हीसी पर्राने ८व्या मिनिटाला १-१ अशी बरोबरी साधली. तर दुसर्या सत्रात ६५व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करीत मालविताने पीव्हीसी पर्राला २-१ आ विजय मिळवून दिला.
अस्नोडा मैदानावर झालेल्या अन्य एका लढतीत दुसर्या सत्रातील इंज्युरी वेळेत (९०+२) अँसिवा वाझने नोंदविलेल्या एकमेव गोलमुळे बिदेश इलेव्हन स्पोर्ट्स क्लबने चर्चिल ब्रदर्सचा १-० असा पराभव केला.