राज्य सरकारने राज्य वन्यजीव मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्याकडे राहणार आहे. तर उपाध्यक्षपद वन मंत्र्यांकडे राहणार आहे.
या मंडळावर पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे, कुठाळ्ळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वन्यजीव मंडळावर एकूण ३१ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वन्य जीव समितीवर पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, अमृत सिंह, चरण देसाई, अर्नोड नोरोन्हा, डॉ. एम. के. जर्नादम, देविदास गावकर, डॉ. बबन इंगोले, धिल्लन गावकर, निवृत्त वनअधिकारी मिलिंद कारखानीस, अजय ग्रामोपाध्ये यांचाही समावेश आहे.