गोव्याचा सलग दुसरा विजय

0
120

>> अंडर-२३ महिलांची क्रिकेट स्पर्धा

गोव्याच्या अंडर-२३ महिला संघाने गुंटुर येथे सुरू असलेल्या अंडर-२३ महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल अरुणाचल प्रदेशवर मात करीत आपल्या सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. गुंटुर येथील आरव्हीआर अँड जेसी महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात गोव्याने १२४ धावांनी मोठा विजय मिळविला.

गोव्याने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षट्‌कांत ५ गडी गमावत १७० अशी धावसंख्या उभारली. कर्णधार संजुला नाईकने ७ चौकार व १ षट्‌कार खेचत ३४ चेंडूत ५४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पूर्वी वेर्लेकरने २३ तर श्रेया परबने ३३ धावा जोडल्या. प्रत्युत्तरात खेळताना अरुणाचल प्रदेशला गोव्याच्या अचूक गोलंदाजीमुळे ५ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ४६ धावांपर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक ः गोवा, २० षट्‌कांत ५ बाद १७०, (पूर्वजा वेर्लेकर २३, श्रेया परब ३३, संजुला नाईक नाबाद ५४, इब्तिझम शेख १९ धावा. नाबम यापू २-२९, शिवांगी त्यागी २-२८, बी. कविता १-३१ बळी. संजुला नाईक २-१९, तेजस्विनी दुर्गाड व तानिया पवार प्रत्येकी १ बळी).