ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करण्यासाठी चोवीस तास सेवा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. एटीमसारख्या मशीनच्या माध्यमातून वीज बिलाचा भरणा करण्याच्या सुविधेसाठी एचडीएफसी बँकेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यातील वीज बिलांची थकबाकी ३८२ कोटी रुपयांवर पोहोचली असून पणजी विभागातील थकबाकीची आढावा घेण्याचे काम सुरू आहे. वीज खात्याने थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी नोटीस पाठविल्यानंतर थकबाकीदारांनी थकीत रक्कम भरण्यास सुरुवात केल्याने वीज खात्याच्या मासिक महसुलामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. ३१ मार्च २०२० पर्यत सर्व थकबाकी वसूल केली जाणार आहे. अशी माहिती मंत्री काब्राल यांनी दिली. वीज मीटरबाबत तक्रार असल्यास प्रथम समांतर वीज मीटर बसविण्याची सूचना करण्यात आली आल्याचेही काब्राल यांनी सांगितले.