मडगावात वीज पडून महिला ठार

0
131

पिसोणे – वार्शे येथील शेतकरी महिला तनुजा ऊर्फ पुष्पा तोळू वेळीप (४३) ही वीज अंगावर पडून ठार झाली. काल सायंकाळी ती मिरची व फळभाज्याच्या मळ्यात गेली होती. त्यावेळी वीज अंगावर पडून पुष्पा ही ठार झाली तर तोळू घाडू वेळीप ही किरकोळ जखमी झाली असून तिला काणकोण इस्पितळांत दाखल केले आहे.दरम्यान, मळार-फातर्पा येथे घरात वीज पडल्यामुळे ओर्ळीम रिबेलो (७५), ज्युवानेता फर्नांडिस (६५) व फ्रान्सिस्क फर्नांडिस (१०) हे तिगेजण जखमी झाले. त्यांना हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

 

राजधानीसह राज्यात मुसळधार पाऊस

राजधानी पणजीसह राज्यातील विविध भागांना जोरदार पावसाने काल संध्याकाळी झोडपून काढले. या पावसामुळे वीजपुरवठ्यावर विपरित परिणाम झाला. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने मान्सून अधिकृतपणे माघारी परतल्याची घोषणा काल केली. पणजी शहरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. शंकरवाडी ताळगाव येथे एका घरावर झाड कोसळल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.