नेत्रावळीतील जमिनप्रकरणी चौकशी ः अधिकार्‍याची नियुक्ती

0
124

राज्य सरकारने नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील जमिनीवर कोणाही व्यक्तीच्या अधिकाराबाबतच्या चौकशीसाठी सांगेचे उपजिल्हाधिकारी आणि एसडीओ यांची नियुक्ती केली आहे.

यासंबंधीचा आदेश अवर सचिव (वन) शैला भोसले यांनी जारी केला आहे.
नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील वेर्ले गावातील काही नागरिकांच्या बागायतीमधील सुमारे चारशे सुपारीच्या झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. ही घटना मे २०१९ मध्ये घडलेली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकामध्ये खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आपल्या बागायतीमधील सुपारीच्या झाडांची कत्तल वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी केल्याचा दावा केला आहे. यासंबंधी स्थानिक पोलीस स्टेशनवर तक्रार सुध्दा दाखल केलेली आहे. त्यानंतर वन खात्याने स्थानिकांचा दावा फेटाळला आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या सुपारी झाडांच्या कत्तल प्रकरणी खास बैठक घेऊन संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक सूचना केल्या होत्या.
स्थानिक नागरिकांनी या सुपारी झाडांच्या कत्तलीच्या प्रकरणी वन खात्याच्या अधिकार्‍याच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक आंदोलन केले. त्यानंतर वन खात्याने वन नेत्रावळीतील वन क्षेत्र अधिकारी जॉन फर्नांडिस यांना निलंबित केले होते.
नेत्रावळी वन्यजीव अभयारण्याबाबत मे १९९९ मध्ये अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.